विहिरीच्या
काठावर
उभी सोडुनिया दोर
मनातला घाव मागे
गर्द हिरवा अंधार
१
किती प्रेम शिंपायचं
किती नाते जपायचं
मन चिंध्या
झाल्यावर
कुणा काय सांगायचं
२
ठोठावून दार दार
वळ आले हातावर
कुणी कधी ऐकले ना
उरी गारठले स्वर ३
कुठे तरी अंधारात
सारे सारे
विसरावं
खोल खोल ऐकांतात
बंध तोडूनिया जावं
४
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा