बुधवार, २० फेब्रुवारी, २०१३

आपलाही मूड कधी



आपलाही मूड कधी
अगदी मस्त असतो
शर्टवर आपणही
छानसा सेंट मारतो .१

कुणी वळून पाहतो
कुणी ओरडून जातो
आपण मुळी ढुंकून
कुणा पाहत नसतो .२

आपल्या मस्तीत शिळ
उगाच घालत जातो
ये जी वाट समोर
उनाड चालत जातो.३

असते कधी नसते
नच कारण शोधतो
जीवनावर आपण
अगदी खुश असतो.४
 
कुठलीशी आठवण
स्वप्नी कुठल्या रमतो
कुठली छान कविता
गुणगुणत बसतो   .५

कणाकणात दाटून
अवघा प्रकाश येतो
स्वत:साठीच आपण
मग मोठ्यानं गातो .६

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...