रविवार, ३ फेब्रुवारी, २०१३

गर्भातल्या स्वप्नावर



पुन्हा डाव मांडलेला

पुन्हा डाव मोडला

जीवनाचा तिच्या  

पार चोळामोळा झाला .१.

पडता पडता खाईत

पण एक हात इवला

आधाराला तिच्या

हलकेच पुढे आला .२.

त्या हाताच्या आधारावर

गर्भातल्या स्वप्नावर

जन्म तिने जगला

मृत्यू तिथे हरला .३ .


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...