सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१३

कृपेची दामिनी





करावे साधन l काय ते मी आता l तोच करविता l मायबाप ll ll

माझे हाती असे l बैसणे आसनी l कृपेची दामिनी l करे सर्व ll ll

केली धावाधाव l अनंत उपाय l नाही परी सोय l झाली कुठे ll ll

तया त्या कष्टाचे l झाले आज चीज l पावली ती मज l जगदंबा ll ll

असे दत्त प्रभू l कृपा शक्ती दाता l तयापदी माथा l ठेवियला ll ll

जन्मोजन्मी पुण्य l केले संपादन l त्याचे वरदान l लाभियले ll ll

जरी ना दर्शन l संवाद स्पर्शन l कृपा परी पूर्ण l ओघळली ll ll



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...