मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३

श्रीदत्त नामाचे l





श्रीदत्त नामाचे l निधान भेटले l जीवास लाभले l महासुख ll १ ll
कैवल्य सुखाचा l महापूर आला l देहीच पाहिला l निर्विकार ll २ll
श्वास प्रश्वासाच्या l जपे अनुष्ठिला l हरवूनी गेला l पाहणारा ll ३ ll
शून्याच्या गाभारी l चैतन्य पुतळा l पाहिला मी डोळा l अनुपम्य ll ४ll
भाग्याचा सोयरा l जाहलो सहज l गेली गजबज l भवचिंता ll ५ ll
जाहले कल्याण l माझिया जन्माचे l परत येण्याचे l नुरे काज ll ६ ll
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दरवळ

दरवळ  ******* शब्द काही दिलेस मला  तू  रांगोळीत रंग भरतांना  अन् स्वप्न नव्या जगण्याचे तम प्रकाशी विरघळतांना ॥ थरथरले मृदू ओठ तु...