उत्तर
*****
काही प्रश्नांना नसते कधीच कुठले उत्तर
तरी असते जगणे
ओझे घेत उरावर ॥
पुन्हा पुन्हा धाव घेते
लाट जरी भूमीकडे
परी येताच किनारा
तिचे धावणे खुंटते ॥
पुन्हा पुन्हा तेच प्रश्न
पुन्हा पुन्हा तीच ओढ
भावनांच्या वावटळी
तीच पुन्हा तोड मोड ॥
सीमारेषा शाप जरी
तोच होतो उ:शाप ही
प्रश्न तेच जगण्याला
बळ देती कधी काही ॥
नसू दे उत्तर आणि
जीव जळू दे विरही
सदोदित याद मनी
हे ही काही कमी नाही ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️