आळंदी जाऊन
***********
आळंदी जाऊन होई रे पावन जन्माचे कल्याण घडे तिथे ॥१
तया पायरीशी घाली लोटांगण
भक्तांची चरण धूळ घेत ॥२
राम कृष्ण हरी घोषात रंगून
देवाला पाहून घे अंतरी ॥३
तया चैतन्याचे चांदणे सुखाचे
थेंब अमृताचे चाख जरा ॥४
विक्रांत मागणे फार काही नाही
सदा चित्त पायी राहो देवा ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा