पसारा
******
म्हणतो जाईल मी हा सोडूनिया पसारा पण काय भोवताली जमेल नवा पसारा
या फांद्या जीवनाच्या का जीवनास आटोपेना
व्यापूनिया आसमंत दिसतो सर्व पसारा
जी हवी ती दिशा या वृक्षास सापडेना
अडवतो प्रकाशास घनदाट तो पसारा
हाती न येती चांदणे पसरून दोन्ही करा
जे भेटते न कधी ते असते काय पसारा
ओझे हवे पणाचे हे उपजे कुण्या मातीत
उगवून मातीतून जातो मातीत पसारा
जो उधळतो फुले तो असे काय फुलांचा
तो रंगही जीवनाचा होतोच ना पसारा
होतोच जन्म शेवटी हा कोपऱ्यात पसारा
विचारतो कुणी काय कुठे गेला रे पसारा
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा