पैसा
*****
हे जग व्यवहाराचे पैशाचे अन कमवायचे माझ्या काय कामाचे उगाच ओझे वाहायचे
पैशात सुख नसते रे पैशात प्रेम नसते
पैसा हे वेड असते भुतागत मागे लागते
पाच पन्नास वर्षाचे असते आयुष्य माणसाचे
यात वाया घालवायचे हे तो लक्षण मूर्खपणाचे
फुगू देत आकडे बँकेचे ढिग जमो त्या कागदाचे
खुळे स्वप्न गाडी बंगल्याचे पंथ अंध हे निरर्थाचे
प्रेम भरू दे कणाकणात आनंद उसळो हृदयात
गाणे उमटावे ओठात हेच घडावे फक्त जीवनात
पोटा कपडयासाठी अन कमवावे रे छतासाठी
पैसे एवढेच कुणी काही जमवावे जगण्यासाठी
बांधूनी हा पैसा उरावर कुणास जाता येत नाही
जग आंधळे डोळा असून त्या कधी दिसत नाही
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘ ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा