बुधवार, १६ जानेवारी, २०१९

बोलायचेअसुनहि


बोलायाचे असूनही
*************:
बोलायाचे असूनही
बोलणे ते होत नाही
झेलायचे असूनही
ऋतू हाती येत नाही

ते फुलांचे रंग तुझे
 मज सोडवत नाही
 देही भिनलेला गंध
स्वप्न सोडवत नाही

 पांघरून तेच वेड
 मोहि चालतो मी धुंद
 हाय परी कुंपणाचा
 पथ येथे होतो बंद

पलीकडे तिच तुच
हरवून जीवनात
अन माझ्या  रिक्त हाती
येते धूळ ती उडत
, © डॉ.विक्रांत प्राभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...