सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

आत्मघर (आळंदीत ...)




आत्मघर  (आळंदीत ...)

सुखाच्या माहेरी ।
आले गे मी माय ।
देखियले पाय । 
अरुपाचे ।।
गर्दीच्या लोटात ।
भेट दो क्षणात।
रंगले थेंबात । 
अमृताच्या  ।।
जाहले व्याकुळ ।
दुणावली आस ।
स्वरूपाचा ध्यास ।
दृढावला ।।
सासर माहेर । 
व्हावे आत्मघर ।
जाणिवेचे द्वार ।
उघडून ।।
माऊली तुजला।
एकच मागणे
सरो येणे जाणे ।
पुनःपुन्हा ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरणार परिक्रमा

गिरणार परिक्रमा ***†**†****** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥ पा...