गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१८

भक्ती बंबाळ



भक्ती बंबाळ.
********

चालला कल्लोळ
भक्तीचा बंबाळ
करी रे सांभाळ
देवराया

देव नि भक्तात
युगांचे अंतर
भरते उदर
अन्य कोणी

मोठाल्या नोटेला
मोठाला आशिष
अन् चिल्लरीस
भाव नाही

चालला विक्रय
श्रद्धेचा उभय
असे निरुपाय
काय तुझा

विक्रांत गर्दीत
चालला वाहत
घडणे पाहात
क्षणोक्षणी


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

समांतर

  समांतर   *****" दोन किनारे सदैव खिळलेले समांतर  युगे युगे साथ तरी  भेट नच आजवर  तीच स्थिती तीच माती  तीच प्रियजन सारी  का...