गुरुवार, २१ जून, २०१८

मंजूर मजला

मंजूर मजला

*********
तुज काय देऊ
मज ना कळते
तुज काय बोलू
मज ना वळते

या खुळ्या मनाचे
उनाड पाखरू
सदैव तुलाच
केवळ स्मरते

छंद तुझा मज
बंध तुझे मज
रे खेचून नेती
मुळी ना ऐकती

तुजसाठी पुन:
जनन घडावे
या अवनीतच
सतत रुजावे

मंजूर मजला
बंधन इथले
संग हवा तव
मीपण नसले

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सार्थ करी दत्ता

सार्थ करी दत्ता ************ विश्वाचे कारण तुच दयाघन  आहे मी जाणून दत्तात्रेया  परी तव कारणे केवळ  जगणे मीपण  सरणे घडेचिना  अशी ...