तू सांगू नकोस
काही
तू पाहू नकोस
काही
मौन असण्यात
तुझ्या
गीत उमलून येई
वळे बाजूस
दुसऱ्या
देत केसास झटका
शब्द ठरले तरीही
मौन थबकून ओठा
असे तुटक वागणे
लांब लांबच राहणे
तुज जमतात कसे
तुज जमतात कसे
हे जीवघेणे बहाणे
चार दिसांची भरती
चार दिसांची ओहटी
म्हणू नकोस असते
हीच जगाची रहाटी
मन उताविळ जरी
सीमा बांधल्या
सागरी
घालमेलीच्या वादळी
लाटा जातात
माघारी
डॉ. विक्रांत प्रभाकर
तिकोणे