गुरुवार, ८ जून, २०१७

मरण म्हणजे ..


मरण म्हणजे सुटका
जीवनाच्या अंधारातून
मरण म्हणजे शांतता
जरा जन्म गोंधळातून

मरणाच्या मृदू कुशीत
जावे हळूवार निजून
जगण्याचे या सारेसारे
वृथा घाव ते विसरून

तिथे अस्तित्व नसणार
आठव येणार कुठून
तिथे जखमा नसणार
वेदना येणार कुठून

मेंदूत पेटलेले कोष
तेव्हा जातील विझून
मीपण मोकळे होत
गुंताही जाईल सुटून 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

संतसंग

संतसंग **** संतालागी संत सदा ओळखती  बांधुनिया घेती पदरात ॥१ मागील जन्माचे पुण्य येते फळा  जळ येते जळा गंगेचिया ॥२ आम्ही लोभी भक्...