जीव अडतो रडतो
खाचखळगी पडतो
जीव हसतो खेळतो
त्याच डावात
रंगतो
गेला मावळून दिन
भय आलेले दाटून
गंध येताच
सुग्रास
सारे जातो विसरून
लाटा सुगंधी
येतात
मन मोहुनी नेतात
सारे भासच तरीही
रंग लाख दिसतात
खाचा करुनी
डोळ्यांच्या
शिसे ओतून कानात
वाजे पैंजण मनात
स्वप्न गिरक्या
घेतात
जीवा सुटेना हा
छंद
श्वास येवूनी संपत
दत्त पाऊलांची याद
कुठे हरवली आत
तोच विक्रांत
अजुनी
होम करी या
देहाचा
तोच आकांत हृदयी
खेळ संपव मनाचा
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा