शनिवार, ३० जुलै, २०१६

एक मुठ विक्रांतास






एक मुठ
गुलालाची
उधळतो
विघ्नेशास ||

एक मुठ
भंडाऱ्याची
शिवरूप
मल्हारीस ||

एक मुठ
कुंकूवाची
आदिशक्ती
अंबाईस  ||

एक मुठ
केशराची
गिरणारी
गोसाव्यास ||

एक मुठ
अबिराची
सावळ्याश्या
गोपालास ||

एक मुठ
राखुंडीची
द्याहो देवा   
विक्रांतास ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २९ जुलै, २०१६

तुझे गीत मला दे रे ...






माझे शब्द तुला घे रे
तुझे गीत मला दे रे
अनंता हे अवधूता
असे खूळ मना दे रे

आकाशात दाटलेले
होवूनिया जळ ये रे
पानोपानी बहरले
आनंदाचे गाण दे रे

चालतांना पावुलात
रामकृष्ण रव दे रे
पहुडता माळावरी
निळे निळे खेव दे रे

सावळेसे स्वप्न तुझे
मिटावे ना कधी बरे
प्राणात या एकारले
भास तुझे व्हावे खरे

अंत मागण्याचा झाला  
शब्द हरवले सारे
मौन उत्थान मनात
कुठे विक्रांत पहा रे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २७ जुलै, २०१६

दत्ताच्या चरणी






दत्ताच्या चरणी  
विक्रांत मूर्धनी
ओघळून पाणी
विसावले  ||
कृपा की करुणा
क्षमा संवेदना
काहीच कळेना
पदलीना ||
मूर्तीत अमूर्त
चैतन्य प्रकट
भव्य आकाशात
उमटले ||
साधनेत रत
डोळीयात दत्त
नाम स्मरणात
गेले क्षण ||
जागृती थिजली
स्वप्नात भिनली
क्षण उजळली
अंतर्बाह्य ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...