वार्ता असतात
साऱ्या
व्यर्थ कुटाळाच्या
बाता
चांग क्वचित तयात
बाकी गाढवाच्या
लाथा
कुणी देऊनिया दाम
बातमी हवी ती
छापे
कुणी उकरून मढे
मेद सडलेले ओपे
कधी फुटती
बातम्या
कधी फाटती
बातम्या
वाट लावाया
कुणाची
कधी बनती बातम्या
बातमी असते मस्त
चटका मसाले दार
लक्ष्य वेधावया
जना
आणि खपाया पेपर
खरे इवले टाकून
बने गोलमाल गोळा
शब्द वाकवून अर्थ
नवा तयार केलेला
धंदा चालला
कुणाचा
मेंदू पडला गहाण
काल वाचलेले हेच
जसे फेकलेले शेण
पत्र विकायला हवे
चॅनल चालाया आणी
निंदा नालस्ती
स्तुतीनी
जन घ्यायचे ओढूनी
किती मळला आरसा
भान दावणाऱ्या नाही
सत्य निष्ठेचा
विचार
खिसा भरणाऱ्या नाही
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा