मजला संकल्पी
गोवूनिया दत्त
ओढूनिया घेत आहे
खरा ||
तयाच्या कृपेनी
पातलो मंदिरी
पाहिली साजरी
मूर्त गोड ||
दिगंबर घोष
निनादे कानात
इवलाले नाद
सर्वांगात ||
तयाच्या आवडी
सरो
जन्म सारा
उदारा दातारा भेट
घडो ||
विक्रांत पातला
कृपेचे ते द्वार
क्षणात संसार हरवला ||
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा