गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

माझी करुणा

माझी करुणा

तुज नारायणा

सारया वासना

तुझ्याच चरणी ll १ ll



माझी प्रार्थना

तुला नारायणा

तुझ्या प्रेमाविना 

नकोच काही  ll २ ll



माझा माझेपणा

तुला नारायणा

काही का घडेना

तुझीच कृपा ll ३ ll



विक्रांत तिकोणे

माझी धावपळ

माझी धावपळ 
थांबावी सकाळ 
उरो मी केवळ 
साक्षीरुप ll ll

नामाचा  कल्लोळ
व्हावा भोवताल 
किल्मिष नि मळ 
जावा दूर ll ll

लागावे ध्यान 
स्वरूपी लीन 
यावे  उमलून  
जीवनपुष्प ll ll

विप्राचे मागणे 
सुटावे मागणे 
सारे देणे घेणे 
शून्य व्हावे ll ll


आपत्तीत तुझे

आपत्तीत तुझे न व्हावे स्मरण 

मागतो मागण हेच आता  ll ll  

मग तू धावून करी सोडवण 

भक्तीस हे न्यून राहू नये ll ll

सुख वा  दुख : असे येवू देत 

नको करू त्यात फेरफार ll ll

दोन्ही या क्षणात तुवा हृदयात 

राहावे निवांत म्हणे विप्र ll ll


सत्याच्या पथी

सत्याच्या पथी चालवी  देवा
नच  व्हावी मति  भ्रष्ट केव्हा ll ll
घडो नियमात माझे आचरण
संग असंगाचा सुटोनी जावा ll ll
जर चुकूनिया गेलो मी चुकून
शास्त केल्याविन नच सोडावा ll ll
कठोर तु दयाळ होऊनिया माय
लेकराचा नाठाळ सांभाळ करावा ll४ll
विप्र म्हणे न अधिक  मागणे
तुझिया चरणी सदा राहू द्यावा ll ll

वाचतो गजानन








वाचतो गजानन पाहतो गजानन


ऐकतो गजानन कौतुकाने ll ll


भेटतो गजानन सांगतो गजानन


समजावे गजानन अध्यात्म ते ll ll


संत गजानन योगी गजानन


प्रभू गजानन स्वामी माझा ll  ll


परी तो गजानन जाणून मन


देईल आलिंगन का मज प्रेमे ll ll


काही न मागण तया प्रेमाविण


अंतरी स्फुरण फक्त हवे ll ll





विक्रांत प्रभाकर

तुझे देणे सारेच




तुझे देणे सारेच
मान्य असे मजला ..१..
न मागतो काही
नाकारितो कशाला ..२..
तू दिलेस सुख
मी मानिले तयाला ..३..
तू दिलेस दु:ख
का म्हणावे तयाला ..४..

विक्रांत प्रभाकर

रुपा वाचून तुला





रुपा वाचून तुला


पाहिले मी


शब्दावाचून तुला


ऐकीले मी


माझ्या वाचून तुला


जाणिले मी


कुणा सांगावे काही


नुरले मी



विक्रांत प्रभाकर

अशोक कोकणे श्रद्धांजली

अशोक कोकणे श्रद्धांजली  *********** महाड मधील आमचे घरमालक कोकणे, भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले, विजय दिलीप अशोक प्रदीप आणि र...