जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
मंगळवार, २ मे, २०२३
सोमवार, १ मे, २०२३
पैसा
पैसा
****
रस्त्यात पडला अनामिक ॥
तेणे मज होईल बहुत सायास
चटके हातास बसतील ॥
तर मग घेऊ कैसे पापी धना
पापाचा उगाणा पुण्या देवू ॥
दिसते या डोळा लोकामाथी पाप
जन्माचे अमाप वाढलेले ॥
तया न कळते तया न दिसते
नरकाचे रस्ते विस्तारले ॥
देई गा श्रीदत्ता सर्वांना सुबुद्धी
नुरावी कुबुद्धी कुठलीही ॥
आधी कळू यावे पाप घडणारे
फेरे पडणारे जन्ममृत्यू ॥
विवेकाची फुटो पालवी मनात
वळावे न हात पाप कर्मी ॥
सुख न धनात सुख न मानात
सुख कामनात अरे नाही ॥
निर्मळ अंतर सुखाचे आगर
वसे प्रभूवर नित्य तिथे ॥
विक्रांत पित्याचा असे सदा ऋणी
दावीली वाहणी मज त्यांनी ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘ .
शनिवार, २९ एप्रिल, २०२३
चित्ती राहा
चित्ती राहा
********
नको मज शालू देखणी पैठणी राहू दे रे जुनी
साडी चोळी ॥१
मग मी रावुळी सहज बसेन
संत रजकण
घेत भाळी ॥२
नको माझं वाक्या पाटल्या सोन्याच्या
हिऱ्याच्या मोत्याच्या
एकावळी ॥३
गोष्टी सांभाळत उगा राहायच्या
देहा स्मरायाच्या
सर्वकाळ ॥४
तुळशीची माळ देई एकतारी
आणि तू श्रीहरी
चित्ती राहा ॥५
मागते मी तुज एकच मागणे
करू नको जीणे
भक्ती उणे ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘ .
गुरुवार, २७ एप्रिल, २०२३
भेटत जा
भेटत जा
*******
कधीकधी बोलत जा
कारण काही नको तू
डोळ्यात उतरत जा ॥
स्वप्न तुझे मागतो ना
चंद्र हाती ओढतो ना
फक्त काही किरणे ती
मनी या उधळत जा ॥
उगाचच हसतेस
उगाच बहरतेस
कधीतरी पाकळ्या त्या
माझ्यासाठी पेरत जा ॥
आकाशात रंग नाही
मनात तरंग नाही
अशा गूढ एकांतात
मजला तू भेटत जा ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘ .
बुधवार, २६ एप्रिल, २०२३
मित्र
मैत्री
*****
मित्र जपायचे असतात
कारण मित्र हेआपली
प्रतिबिंब असतात
आरशा वाचून पडलेली
मित्र हे आपली स्वप्न असतात
निद्रे वाचून दिसणारी
तिथे आपणच आपल्याशी बोलतो
आपणच आपल्याला ऐकतो
दिशा ठरवतो मार्ग बदलतो
आपल्या ध्वनी नादाचा
प्रतिध्वनी मित्र असतो .
पण कधी कधी
आपल्या त्या मित्राचे
मित्रही वेगळे होवू लागतात
तेव्हा ते मित्रही
वेगळे वाटू लागतात
वेगळे वागू लागतात
वेगळ्या रस्त्याने जाऊ लागतात
अन वेगळी गाणी गाऊ लागतात
त्याला काही इलाज नसतो
सारीच फळे एकाच झाडाची
किती दिवस सोबत राहतात
तरीही आपण असतो
शतशः त्यांचे ऋणी
त्या ओघळत्या सोनेरी क्षणी
जीवन सुंदर केलेले असते त्यांनी
तेच मित्र अन ती मैत्री सदैव राहावे ही
इच्छा असते मनात अन असावी ही
पण अट्टाहासने होत नसते काहीही
कारण आज उगवला
मित्र जरी तोच असला
तरी तो दिवस तोच नसतो
जरी तेवढाच सुंदर असला
तरी तसाच नसतो
जेव्हा मित्र सोबत असतो
तेव्हा तो त्या दिवसाचे सार्थक करतो
तो दिवस ग्रेटच असतो
कारण आपण आपल्या सोबत असतो
पण तो जातो
त्यानंतर तो चंद्र ही आपलाच असतो
रात्रही आपली असते
ते ग्रह तारका आपली असतात
नदी वृक्ष आपलीच असतात
मित्र होऊन आपल्याला रिझवतात
सदैव सोबत करत असतात
त्या वृक्षाची कुरणाची नदीची क्षितिजाची
आपली मैत्री ही तशीच उत्कट असते
तेही जीवनाचे गाणे असते .
कारण मैत्री ही मित्राहूनही मोठी असते .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘ .
मंगळवार, २५ एप्रिल, २०२३
उपवास
उपवास
*****
श्रद्धाळू मनाचे सरे उपवास केलेले सायास पूर्ण झाले ॥१
कुणा न ठाऊक काय मिळवले
काय गमावले कुठे किती ॥२
परी दृढ गाठ बसली मनात
झाली बळकट श्रद्धा एक ॥३
उठली मनात प्रार्थना ही खोल
ओठी आले बोल ज्ञानेशाचे ॥४
हरवली मात अस्तित्वाचा अर्थ
माणसाची जात सुखी कर ॥५
रहा रे कृपाळू सदा जगावर
दुःखाचा आकार मिटवून ॥६
बाकी तो आहार कुणा निराहार
व्यर्थ कारभार झाला उगा ॥ ७
विक्रांता कळला अर्थ उपवासी
जोडलो देवासी जगताशी ॥८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘ .
सोमवार, २४ एप्रिल, २०२३
बीजेचा चंद्र
बीजेचा चंद्र
**********
आनंद मोहर मन झाले ॥१
इवलीशी रेखा जणू भाळावर
कोणी तालेवार मिरवती ॥२
तैसे ते आकाश प्रोढीने भरले
शुक्र विसरले भरजरी ॥३
पश्चिमेची गाणी आली कानावर
दूर रेतीवर उमटली ॥४
कुठे उगवली कुठे पेरलेली
श्रद्धा थरारली मनातली ॥५
पाहता पाहता देखावा सरला
आभास मिटला विलक्षण ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
परिक्रमा
परिक्रमा ******* गावा गावात फिरत आहे अन्नक्षेत्री जेवत आहे अन् अर्थ या जीवनाचा माईकडे मागत आहे प्रचंड पाणी प्रवाहाचे नितळ नि...
-
परिक्रमा ******* गावा गावात फिरत आहे अन्नक्षेत्री जेवत आहे अन् अर्थ या जीवनाचा माईकडे मागत आहे प्रचंड पाणी प्रवाहाचे नितळ नि...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
जीवाभावाची मैत्रीण *************** आई तू मैत्रीण माझी जीवाभावाची माझ्या श्वासात भरलेली गाणी तुझी आई तू घडविले या गोळ्...
-
हरवला दत्त *** हरवला दत्त इथल्या गर्दीत निघाला शोधीत निवाऱ्याला ॥१ पावलोपावली लागतात ठेचा पथ माणसांचा हरवला ॥२ घुसमटे श्वास सोन...
-
. काळाचा खाटिक ************ बळीचा बकरा जाई मिरवत प्रेमाने भरत धष्ट पुष्ट गेला नाही तरी शस्त्र धारधार असे भाळावर लिहलेले क...
-
दान **** देवदारी कामना करू नये भक्तांनी देवदारी याचना करू नये ट्रस्टींनी ताट प्रसादाचे उगा पुढे पुढे करूनी घालू नये गळ घ्या हो ...
-
वर्ख ***** त्या तुझ्या धुंद मधुर स्मृती अजूनही मनी करतात दाटी कुठल्याही सांत्वनेवाचुनी तया ठेवतो मी कुरवाळूनी सुंदर शापित अ...