जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
रविवार, ३ फेब्रुवारी, २०१३
बुधवार, ३० जानेवारी, २०१३
सोमवार, २८ जानेवारी, २०१३
कवी ज्ञानोबाची बाळे
नटुनिया विभ्रमांनी
कविता ही पानोपानी
नाद लय रंगातुनी
पिंगा घाली माझ्या मनी ll १ ll
संगे हसुनी खेळूनी
कधी रडूनी झुरुनी कविता ही पानोपानी
नाद लय रंगातुनी
पिंगा घाली माझ्या मनी ll १ ll
संगे हसुनी खेळूनी
भान अवघे सुटुनी
आलो आनंद भुवनी ll २ll
शब्द नवीन जुन्यांचे
कधी तुमचे नि माझे
शब्द गूढ अनवट
सोपे सरळ सोट ll ३ ll
हात घालूनिया हाती
जेव्हा नवे रूप घेती
अर्थ धुमारे फुटती
नव्या पाहता दृष्टी ll ४ ll
अहो शब्दाचिया बळे
कवी ज्ञानोबाची बाळे
धन्य तया स्फूर्तीलागे
वर चिरंजीव मागे ll ५ll
http://kavitesathikavita.blogspot.in/
शनिवार, २६ जानेवारी, २०१३
झाड आणि वस्ती
एक सुंदर झाड होते.
उंचच उंच गर्द पानांचे
फळांनी लगडलेलं
किलबिल करणाऱ्या
पाखरांनी अन घरट्यांनी
अवघे भरून गेलेलं.
शिकारी प्राण्या पासून
खूप सुरक्षित असलेलं.
म्हणून मग
त्या झाडावर हळू हळू
नवीन पाखर येवू लागली
घरटी बांधून राहू लागली
सुरवातीला त्याचे कुणालाच
काही वाटले नाही
हळू हळू पण फांद्या
कमी पडू लागल्या
बेचक्या तर उरल्याच नाही .
तरीही झुंडी मागून झुंडी
पाखर येतच राहिली
एव्हाना त्या झाडाजवळ
ससाणे साप व्याधही
काही वावरू लागले
पण जगण्यासाठी ते झाड
खूपच सोयीस्कर होते
म्हणून ती पाखर तरीही
तिथेच राहू लागली
पण ते झाड आता
अस्ताव्यस्त दिसू लागले
जागा कमी पडू लागली
काही स्वार्थी पाखरांनी
बुंधा फांद्या टोकरून
नव्यांना जागा करून दिली
मोबदल्यात
भरपूर कीड खाल्ली .
त्यामुळे झाड खचू लागले
खुरटू लागले
ते पाहून झाडावरची
जुनी जाणती गोळा झाली
अन त्यांनी फर्मान काढले
सारी नवीन घरटी
तोडण्यात यावीत
खूप भांडण पाखरात
खूप लढाया झाल्या
अन शेवटी त्यावरही
एक तोडगा निघाला
अमुक काळा नंतरची
घरटी पाडण्यात यावीत
काडी काडी गोळा केलेलं
एकेक घरट मग
उध्वस्त होऊ लागलं
भरपावसात भिजलेली पिलं
पंखाखाली घेवून
पक्षीण आक्रोश करू लागली
कीड खावून फुगलेली पाखर
आपल्या उंच घरात
गुपचूप बसून राहिली
पावूस पडतच होता
मोडलेल्या घरट्यांची
काडीन काडी वाहवत होता
विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
वर्दी आणि प्रजा
वर्दीआणि प्रजा ************ डरपोक प्रजा घाबरे वर्दीला साहेबी काठीला अजूनही ॥ अजूनही माथी गोरा तो साहेब करतो रुबाब बुटातला ॥ क...
-
सर **** कधी ओघळेल प्रभू प्रेम सर मनी झरझर तृषार्थ या ॥ कधी ओलावेल मृतिका चित्तीची रुजेल भक्तीची बी बियाणे ॥ कधी विरूढेल ज्ञान...
-
उधारी ***** ठेवू नको देवा कुणाची उधारी माझ्या उरावरी येथे आता ॥ १ फिटू दे रे कर्ज माझे हे सव्याज नको देवा लाज आणू मज ॥२ कुणाच्...
-
मला भावनांचं अवडंबर नव्हतं मांडायचं खरतर पण माझ्या डोळ्यास पाझर मला ओढाळ प्रेमावर नव्हतं लिहायचं खरतर ...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
सुटलं आहे वादळवार घट्ट लावून खिडक्या दार थोपावत आहे मी सार प्राणपणान लावून जोर जुनी आहेत माझी दार अन गंजल...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
तू स्मरावा हृदयी राहावा म्हणून धावा माझा || तू कळावा जन्म फळावा म्हणून धावा माझा || या हाके...
-
डुकरांच्या गल्लीतून **************** डुकरांच्या गल्लीतून असे येणे जाणे घरी मग चावणारच डुक्कर कुणा कधीतरी काळी पांढरी हिरवी निळ...
-
निर्धावल्या नोकरीत निर्धावला उपकार इथे काही होत नाही येणे जाणे उपचार अडलेल्या जनतेचे देव आम्ही सरकार ...
-
ॐकारेश्वर (नर्मदाकाठ च्या कविता ) ******** श्रद्धेचा व्यापार खुळखुळे भक्ती तरी देवा तिथे दिसे तुझी वस्ती इथे पूर्ण होती किती ...

