गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

आपत्तीत तुझे

आपत्तीत तुझे न व्हावे स्मरण 

मागतो मागण हेच आता  ll १ll  

मग तू धावून करी सोडवण 

भक्तीस हे न्यून राहू नये ll २ll

सुख वा  दुख : असे येवू देत 

नको करू त्यात फेरफार ll ३ll

दोन्ही या क्षणात तुवा हृदयात 

राहावे निवांत म्हणे विप्र ll ४ll


सत्याच्या पथी

सत्याच्या पथी चालवी  देवा
नच  व्हावी मति  भ्रष्ट केव्हा ll १ll
घडो नियमात माझे आचरण
संग असंगाचा सुटोनी जावा ll २ll
जर चुकूनिया गेलो मी चुकून
शास्त केल्याविन नच सोडावा ll ३ll
कठोर तु दयाळ होऊनिया माय
लेकराचा नाठाळ सांभाळ करावा ll४ll
विप्र म्हणे न अधिक  मागणे
तुझिया चरणी सदा राहू द्यावा ll ५ll

वाचतो गजानन








वाचतो गजानन पाहतो गजानन


ऐकतो गजानन कौतुकाने ll १ll


भेटतो गजानन सांगतो गजानन


समजावे गजानन अध्यात्म ते ll २ ll


संत गजानन योगी गजानन


प्रभू गजानन स्वामी माझा ll  ३ll


परी तो गजानन जाणून मन


देईल आलिंगन का मज प्रेमे ll ४ll


काही न मागण तया प्रेमाविण


अंतरी स्फुरण फक्त हवे ll ५ll





विक्रांत प्रभाकर

तुझे देणे सारेच




तुझे देणे सारेच
मान्य असे मजला ..१..
न मागतो काही
नाकारितो कशाला ..२..
तू दिलेस सुख
मी मानिले तयाला ..३..
तू दिलेस दु:ख
का म्हणावे तयाला ..४..

विक्रांत प्रभाकर

रुपा वाचून तुला





रुपा वाचून तुला


पाहिले मी


शब्दावाचून तुला


ऐकीले मी


माझ्या वाचून तुला


जाणिले मी


कुणा सांगावे काही


नुरले मी



विक्रांत प्रभाकर

सारे जीवन









सारे जीवन प्रकाशान


जावू दे भरून .


कणाकणातून बहरून


येवू दे चैतन्य .


माझे मीपण हरवून


संपू दे हे प्रश्न  .


इतकेच असे मागण  


कळू दे जीवन


तुझ्या कृपा प्रसादान


हे करुणाघन





विक्रांत प्रभाकर

अहंच्या खांबाला




अहंच्या खांबाला
बांधता चेतना 
मुक्तीची वाट
गवसता गवसेना .
होताच मोकळे
सोडून बंधना
उर्जेचा पूर
दहाही दिशेंना .

विक्रांत प्रभाकर

डॉ. मनीष दोशी Dy MS (I/C)राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त)

डॉ. मनीष दोशी Dy M.S.(I/C) राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त) ***************** खरे जे डॉ .मनीषला ओळखतात  त्यांना सांगायची ...