ललिता देवी ध्यान
***************
उदीत अरुणा सम असे रक्तवर्णकांती
ध्यान तुझे धरी अंबे त्रिनयना भगवती
मुकुट शिरी सोनेरी शोभे रत्न माणिकांनी
तारा नायक चंद्र ही साजे शुभ्र किरणांनी
वदनी आईच्या हास्य मधु दिसते मोहक
उरोज पुष्टही देती माते सौंदर्य अधिक
हाती शोभते चषक जे स्वर्ण रत्नजडीत
मधु भरले तुडुंब आणि अली सभोवत
प्रसन्न वदना सौम्य माता वसो माझे उरी
पदकमले सदैव जिची रत्न घटावरी
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️