यात्रा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
यात्रा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५

बंद यात्रा

यात्रा
****
तलावाचा मासा टाकीमध्ये आला 
त्याच त्याच पाण्या खूप कंटाळला 

इथे भीती नाही संकटेही नाही 
वेळेवर अन्न छान सारे काही

पण किती दिन तीन बाय दोन 
जगायचे असे मान वळवून 

खोटे बुडबुडे रचले शिंपले 
कण वाळूचे ही ओळखीचे झाले

इथून सुटका कधीच का नाही
फसलो विकलो असे दुःख हे ही 

एक बंद यात्रा चार काचेतली 
वाहतोय काळ परी थिजलेली.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


सर

सर **** कधी ओघळेल प्रभू प्रेम सर  मनी झरझर तृषार्थ या  ॥ कधी ओलावेल मृतिका चित्तीची  रुजेल भक्तीची बी बियाणे ॥ कधी विरूढेल ज्ञान...