यात्रा
****
तलावाचा मासा टाकीमध्ये आला त्याच त्याच पाण्या खूप कंटाळला
इथे भीती नाही संकटेही नाही
वेळेवर अन्न छान सारे काही
पण किती दिन तीन बाय दोन
जगायचे असे मान वळवून
खोटे बुडबुडे रचले शिंपले
कण वाळूचे ही ओळखीचे झाले
इथून सुटका कधीच का नाही
फसलो विकलो असे दुःख हे ही
एक बंद यात्रा चार काचेतली
वाहतोय काळ परी थिजलेली.
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .