पूनव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पूनव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३ मार्च, २०२६

ओळख




ओळख
*******
असा चंद्र पुनवेचा 
माझ्या डोळी उतरतो 
एक एक अक्षराला 
नवा साज अन् देतो ॥

काही व्यथा काळजाच्या 
पुन्हा देहापार नेतो 
खोल खोल कातळाचा 
डोह रुपेरीसा होतो ॥

कुठे कुण्या देशी असे 
गीतं माझी सजलेली 
तीच नित्य जुनी मिठी 
काळजात पडलेली ॥

विसरून ओळखीला 
मैत्री नवी जडलेली 
तीच ओल मातीतली 
नभास या व्यापलेली ॥

जरी मनी असे ओढ 
कोस कोस ओलांडली
वाट त्याच दिवसाची 
डोळ्यांमध्ये दाटलेली ॥

घडेल ते काहीतरी 
जरी कळणार नाही 
अंतरात प्रकाशाच्या 
कोसळून शुभ्र सरी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

तुकडा आयुष्याचा

तुकडा आयुष्याचा  ************* हा तुकडा आयुष्याचा  टेकला आभाळाला  अन्  धुरळा मातीचा प्रकाशाचा झोत झाला  जरी भाग्य मातीचे  सदा अस...