रविवार, ८ मे, २०१६

स्वप्न पेटले






स्वप्न उदास उधार

भर रानात पेटले

कसे किती करू गोळा

प्राण देहास विटले



देव नभात असावा   

जणू अभ्राचा पसारा

पुण्य गंजले साचून

होय डोळ्यात निचरा



दहा दिशांनी गिळली

आस उरातली ओली

साद घालावी कुणाला

चहू बाजूला पोकळी



अश्या भयाण राती

घरी अंकुर फुटला

ओठ लाल ओलसर

जीव ओझ्याने वाकला



डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सीताराम चहावाला

सीताराम चहावाला  *** सीतारामच्या हाताचा  तो खूप उकळलेला  काहीसा कडवट घट्ट गोड  पाच सहा घोटात संपणारा  चहा  पिता पिता  कितीतर...