मंगळवार, १० मे, २०१६

दत्ता सावरा






दत्ता सावरा  
दत्ता आवरा   
दत्ता वावरा
माझ्या मनी

दत्ता हासवा
दत्ता नाचवा  
दत्ता जागवा  
प्रीत तुमची  

दत्ता रडवा  
दत्ता बडवा  
दत्ता बरवा
लाभो जनी

दत्ता प्रतिपाळ
दत्ता लडिवाळ
दत्ता सर्वकाळ
रहा ओठी  

दत्ता जाणा हो
दत्ता वाणा हो
दत्ता म्हणा हो
मज आपुला  

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...