कणोकणी दाटलेला
दत्त डोळा माझ्या
यावा
क्षणोक्षणी
चाललेला
टाहो ओला सत्य
व्हावा
गुणागुणी असे कळे
जीव चळे पांघराया
मनोमनी
सर्वसाक्षी
चित्ता हवे
जाणावया
काय माझी चूक देवा
जीवनाला स्पर्श
नाही
वाहतो हे श्वास
ओझे
दंड हा ही कमी
नाही
नावाला विक्रांत असे
जगण्यात दम नाही
दत्ता तुझ्याविन जिणे
अन्य दुजा भ्रम
नाही
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavitablogspot.in
http://kavitesathikavitablogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा