गुरुवार, १२ मे, २०१६

गीतेचा द्वेषी भेटता










जुनाट मळका चष्मा घालून आपल्या डोळ्यावर
जेव्हा कुणी जाणू पाहतो गीता अर्था तर्कावर
तया काय कळते हाय लावता झापड मनावर
द्वेषाने अंग जळते विष उमटते अन भाष्यावर

मतांधता जेव्हा येते अशी कुणाच्या जगण्यात
तया कधी न कळते कसा तो जन्म प्रकाशात
गांडूळागत वळवळत ते राहतात मजेत चिखलात
स्वर्ग मानून अंधाराला सुखे स्वये सदा गोंजारत

अन मग किरणे सुर्याची पडू लागताच देही  
अजून जाती खोलवर भक्षण करीत ओली भुई  
काहीच शक्य नसते तेव्हा ते करती तडफडात
एक अमृत वर्षा तयाच्या ओघळून जाते दारात

मला त्यांचा राग खरच कधीच येत नाही
द्वेष धिक्कार मनामध्ये कधीच उमटत नाही
मनातील कृष्णाकडे मी केवळ पाहत असतो
एक अर्थ नवा अन मनामध्ये उलगडत जातो

गीता माझी आई खरी त्यांचीही तीच असते
नाळ तोडून त्यांनी पण वृत्ती बदलली असते
पुन्हा किती जन्म तया पुन्हा किती येणे असते 
बहूनां जन्मनामन्ते मनी माझ्या गुंजत राहते 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...