आपण
विणतो जाळे
जगण्यासाठी
स्वत:ला
जाळ्याच्या
गुंत्यात मग
घेतो
गाडून स्वत:ला ||
पदाचे
प्रतिष्ठ्तेचे
झगझगीत
कपडे
घालतांना
नकळत
करतो
नग्न स्वत:ला ||
कधी कुठल्या
ध्येयाची
फाजील
सत्ता केंद्राची
पाटी
लावून दाराला
करतो भग्न
स्वत:ला ||
अहो
स्वामी महाराजे
जगायचे
जगायला
काय कुण्या
दारावरी
करण्या
श्वान स्वत:ला ||
मान्य
मजला दुनिया
तशी
कठीण असते
पण का
जड असते
म्हणणे
गाण स्वतःला ||
डॉ.विक्रांत
प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा