शनिवार, २१ मार्च, २०१५

स्वाईन फ्लूच बाळ






मास्क लावून मी
स्वाईन फ्लूच बाळ पाहत होतो
नाही म्हटलं तरी मनात
टेन्शनच होतं  
सर्दी पाडस झालेलं
शेंबडे पोर होतं ते
बोरातल्या तक्षकागत
मला वाटत होतं
आणि ती
कवटाळून त्याला
त्याचं रडे थांबवत होती
मास्कच काय
तिला तर
कपड्याची ही शुद्ध नव्हती
झोप न झालेली
चेहरा उतरलेली
थकलेली
दमलेली
प्रार्थना चिंता काळजीच
जणू मूर्तिमंत होती   
मरणासमोर
वाकवून मान
जणू
घे पर्याय म्हणत होती
कारण  
ती त्याची आई होती

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मारूत

मारुत ******  एक रुद्र हुंकार  भेदत जातो सप्त पर्वत  पृथ्वी आप तेज वायू  सारे आकाश व्यापत  थरथरते धरती ढवळतो सागर  उ...