काय मागू कुणास मी
देणारा कुणीच नाही
थांबले शोधणे अन
आशा उरलीच नाही
पळणाऱ्या पाडसाचे
भय पावुलात साचे
हरवताच माऊली
जग होय श्वापदाचे
असे का छापील भाव
शरण तुज येण्यासाठी
मोजुनी वह्या लिहले
असावे का पुण्य गाठी
येवूनी नभांगणी या
हो शलाका प्रकाशाची
आर्त क्षीण हाक ऐक
विझणाऱ्या अंतराची
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा