रविवार, २९ मार्च, २०१५

अटळपणे





त्यांना झेंडा नसतो
अजेंडा नसतो
गाव नसते
प्रांत नसतो
देश नसतो
आणि खरतर 
चेहराही नसतो
स्वत:चा ..
ते असतात एक
हपापले जनावर  
साचार
जगद्धौरकाचा
लावूनी मुखवटा  
आपल्या चेहऱ्यावर
आणि जेव्हा ते
पाजाळतात आपली
मुजोर नजर
अन टाकतात   
एक तुच्छ कटाक्ष
तुमच्यावर
तश्याच काही  
कुजक्या शब्दाचा  
चिखल फेकत
अंगावर 
तुम्हीं घाबरता
ते लूत भरलेले
श्वान  
तुम्हाला चावु नये म्हणून
हातातला दंडुका
पाठीमागे ठेवता दडवून..
एक हाडाचा तुकडा
त्याच्या समोर टाकून
घेता थोपटून
आपली पाठ
किती चतुराई
दाखवली म्हणून
पण त्यानंतर  
त्यांचा गोंगाट नि
उपद्रव वाढतच जातो  
जो येतो
तुमच्या माजघरात
शेजघरात देवघरात
बंद दाराखिडक्यांना भेदून
अटळपणे
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

घेई सोबत

घेई सोबती ******** कंटाळून जगताला  म्हणे विक्रांत दत्ताला  का हो टाकले मजला  ऐश्या या भोगवट्याला  तुम्ही घेतले ते छान  एक कौपीन ...