सोमवार, १४ एप्रिल, २०१४

बाबासाहेब ...


 


आमच्या हिंदुत्वावर थप्पड देवून
बाबासाहेब तुम्ही गेलात
आमचा त्याग करून
तुम्ही केलेत ते अयोग्य
असे मी कसे म्हणू शकेन
लाखो करोडो जणांना
तुम्ही दिलीत अस्मिता
अधिकार, एकीचे बळ
आणि शिकविले
माणूस म्हणून जगायला !
एका क्षणात पायरीच्या दगडाला
पोहचवले कळसाला
हे केवळ महामानवच करू शकतात
पण तुमचे ते जाणे
अगदी योग्य असूनही
माझ्या मनाला डाचत राहते
आमच्या बापजाद्याचे करंटेपण
पिढ्यानपिढ्याचे आंधळेपण
अरे आम्हाला एवढेही करता न आले
जन्माधारित उच्चनीचतेला
गाडता न आले (अजूनही....)
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...