सोमवार, १४ एप्रिल, २०१४

तो परत नाही आला तर ..






तो कामावर जातो
तेव्हा तिला वाटते
किती बरे होईल
तो परत नाही आला तर
आणि ते एकच
दिवा स्वप्न पाहत
ती जगते दिवसभर
नऊ ते सहा
वेळ जातो भरभर
सहा वाजतात
दारावर बेल वाजते
तिचे स्वप्न खळकन फुटते
आणि मग ते दुस्वासाचे
तुच्छ कटाक्षाचे
वाकड्या शब्दांचे
तिरसट आवाजाचे
सहजीवन सुरु होते
रात्री निजे पर्यंत
कदाचित स्वप्नांतही ..
.......
कधी कधी तिला वाटते
ती वेडी तर नाही झाली
भिंतीवर डोके आपटत 
जगणाऱ्या कैद्यागत
भरसमुद्रात भरकटलेल्या
एकट्या खलाश्यागत
अन हे जगणे म्हणजे
होणारा भास असावा
त्या भयाण एकांतात

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...