शुक्रवार, २१ जून, २०१३

समजा मी,मी नसतो





समजा मी,मी नसतो
तर मग मी कोण असतो ?
अर्थात तरीही मी मीच असतो
पण आता जो मी आहे  
तो मी मुळीच नसतो
म्हणजे जो मी, मी ला ओळखतो
तो मी तर मीच असतो
पण ज्याला मी ओळखतो
तो मी तेव्हा वेगळा असतो
त्या वेगळेपणात जेव्हा मी
मीपणे मीहून वेगळा असतो
त्या मी ला हि मीचा प्रश्न पडतो
तेव्हा जो मी मी ला शोधतो
त्या मी लाही मी नच मिळतो
कारण मी चे कळणे न कळणे
मी पणावर अवलंबून नसते

विक्रांत प्रभाकर              
http://kavitesathikavita.blogspot.in/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मेघ सावळी

मेघ सावळी ******** मेघ सावळे व्याकुळ ओले जेव्हा  निळ्या नभात जमले हर्षनाद तो गंभीर गहीरा ऐकून वेडे मन बावरले शामल रूप लोभसवाने  ...