सोमवार, १७ जून, २०१३

बेरंग





तिची तार तुटलेली
त्याचा स्वर फाटलेला
आरतीत होता त्यांच्या
रंग सारा विटलेला

होते माहित तरीही
तिने कानाडोळा केला
खोबऱ्यात मोदकांच्या
नारळ तो खवटला

काय दिले देवराया
पूजा अर्चा करुनिया
गळयामध्ये बांधियले
मज आग्या वेताळाच्या

तोही म्हणे का रे बाबा
हीच हडळ भेटली
ऐशीकैशी माझ्या गळा
दोर फासाची लावली

आधी कर रे सुटका
करू जय मग तुझा
कसे काय करायचे
प्रश्न सोडव तू तुझा

विक्रांत प्रभाकर              
http://kavitesathikavita.blogspot.in/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दुर्लभ

दुर्लभ ***** तुझी भक्ती दत्ता असे रे दुर्लभ  मोतीयाचा गर्भ शिंपी जैसा ॥१ ज्याची कुळवाडी असे देवभक्ती  सदाचार वृत्ती सर्वकाळ ॥२ ज...