सुनसान होती आळी
सुनसान होता रस्ता
टीव्हीवर चालू होती
महाभारताची कथा
सात वर्षाची चिमुरडी
गच्चीत उभी होती
कौतुक रित्या रस्त्याच
उगाच पाहत होती
बेसावध तो भेटून प्रियेला
कुठेतरी होता चालला
तोच अचानक यमदूत
बसलेले दबा धरून
सरसावले पुढे आपले
अमोघ शस्त्र घेवून
डावीकडून तीन अन
उजवीकडून तीन
उभे ठाकले तया घेरून
प्रतिकारा संधी न देत
फटकन फिरली बँट
बॉल झाले डोके त्याचे
धाडकन पडला रस्त्यात
वेळ मुळी न घालवता
कुणी सराईत त्यातला
शास्त्र कुठले विचित्र
घेवून पुढे सरसावला
विछिन्न झाले शिर
आला रक्ताचा पूर
भयचकित चिमुरडी ती
राहिली फक्त किंचाळत
महाभारती रंगला होता
रक्तरंजित एक वध
चार चाळीच्या साम्राज्याचे
मरून गेले एक प्यादे
दादा मोठ्या पहाऱ्यात
शांत चिरेबंदी वाड्यात
ती त्याची सखीही
मग गेली मरून
विस्कटलेल्या जीवनावर
घासलेट काडी ओढून
अन ती चिमुरडी...
उठे रात्री किंचाळून
भये ओलिचिंब भिजून
स्वप्न कुठले भेसूर
सांगे सर्वा रडरडून
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
http://kavitesathikavita.blogspot.in/