रविवार, २५ मे, २०१४

तुझ्या प्रीतीचे कवडसे







तुझ्या प्रीतीचे कवडसे
माझ्या मनी उतरतात
माझ्या गर्द अंधारात
स्वप्न उषेचे उसळतात

तुझ्या सावळ्या रूपाने
ये शीतलता हृदयात
माझ्या दु:खाचा अंगार
नाहीसा करते क्षणात

तुझे बोलणे जलधारा
चिंब चिंब मला करतात
तुझेच शब्द चार अन
डोईवरी छत धरतात

लिहिता लिहिता कविता
तुजला मनी आठवतो
तुच कविता सखी माझी
शब्द व्यर्थ हे जाणतो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


शुक्रवार, २३ मे, २०१४

भावानुवाद ; क्या से क्या हो गया






होते काय घडले काय बेवफा प्रेमात तुझ्या  
अपेक्षिले काय मी दिलेस तू काय बेवफा प्रेमात तुझ्या  
असो आता हा भ्रम संपला कळले प्रेम हे काय आहे
म्हणते जग प्रेम ज्यास वस्तू अशी काय आहे      
भोगीले मी काय काय बेवफा प्रेमात तुझ्या  
तुझ्या माझ्या जगात आता युगायुगांचे अंतर आहे
खरे कुणा कधी वाटेल का हे सोबत चाललो होतो दोघे 
वेगळे याहूनी होणार काय बेवफा प्रेमात तुझ्या  

भावानुवाद
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २२ मे, २०१४

नादावतो अजुनी जीव









नादावतो अजुनी जीव
       अजुनी शीळ घालतो
मोहरतो स्मरूनी तिला
       स्मरूनी उरी हेलावतो
आठवतो मिटुनी डोळे
       मिटुनी मनी सुखावतो
मिरवतो दु;ख इवले
       दु:ख सजवून ठेवतो
मागतो शब्द उसने
      शब्द जगास दावितो
विसरतो नाव तिचे
       नाव काही कमावतो 

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/






अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...