शनिवार, ६ एप्रिल, २०१९

दिगंबरी मन





दिगंबरी मन
***********
दिगंबरी मन
ठेविले वाढून 
मी पण काढून 
बाईयांनो ॥
घडले भजन 
नाही वा कीर्तन 
दिला पेटवून 
प्राण फक्त॥
जप तप नच
घडले यजन
व्याकूळ होवून 
शब्द दिले ॥
जरी जगतोय 
संसारी वाहून 
अंतरी स्मरून 
सदा तया ॥
काळवेळ काही 
ठाव मला नाही 
येता याद देई
गळा मिठी ॥
सखा गिरणारी 
भरला अंतरी 
जगणे उधारी 
आता मला ॥
॥ गुरुदेव दत्त ॥
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुढी पाडवा

शुक्रवार, ५ एप्रिल, २०१९

दत्ता मेकॅनिक








दत्ता मेकॅनिक
**************

दत्ता माझी गाडी
चालव चालव
चाके ही हाल
पंक्चरली ॥


दत्ता मेकॅनिक
होई बा तू माझा
घेई इंजिनचा
ताबा आता ॥

मन कार्बोरेटर
विषयी दाटला
तया बुचकळा
विरक्तीचं ॥

चित्ताचे फिल्टर
गेलेय मळून
साफ त्या करून
पुन्हा ठेवा ॥

प्रेमाच्या इंधनी
टाका हो भरून
ऑइल नवीन
ज्ञान ते द्या   

बॅटरी विवेक
नावेक पाहून
गिअर टाकून
स्टार्ट करा  

साधने धुवून
आणा मार्गाव
श्वासा हा ओंकार
हॉर्न करा

मग हा धावेन
विक्रांत सुखानी
दत्ताची गाणी 
वाजवित ॥

***
 श्री गुरुदेव दत्त 


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

दत्ता पुस रेषा




दत्ता पुस रेषा
**********

दत्ता पुस रेषा
माझ्या कपाळाच्या
दुराव्यास तुझ्या
कारण ज्या ॥


काय करू देह
वाहूनिया ऐसा
होई न उदासा
प्रपंचास 


जगतो दुःखात
आधी व्याधींच्या
पदास ह तुझिया
विसरून 

काय केले पाप
कुठल्या जन्मात
तुझ्या विरहा
तोय 

मायबाप दत्ता
सांभाळ विक्रांता
प्रारब्धाचा वाटा
मोडूनियां 
********

श्री गुरुदेव दत्त 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


बुधवार, ३ एप्रिल, २०१९

स्वामी देवा




स्वामी देवा
*************
तुमच्या कृपेनी
जगतोय स्वामी
प्रेमाचे लेऊनी
देह वस्त्र

उणी माझी भक्ती
उणा माझा भाव
परि तू वर्षाव
कृपा मेघ ॥

दारी तुझ्या काही
घडली ना सेवा
प्रेमे परि देवा
कवळीले ॥

तुवा सांभाळले  
घरा बोलाविले
म्हटले आपले
माझा तु रे ॥

याहून अधिक
काय हवे जीवा
मिळताच ठेवा
कैवल्याचा ॥

विक्रांत उंडार
पदी असू द्यावा
मागे स्वामी देवा
हेची आता 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

 श्री गुरुदेव दत्त 

******

मंगळवार, २ एप्रिल, २०१९

एक तुझी आस





एक तुझी आस
*************
जगण्या कारण
शोधले बरवे
अवघे फसवे
वाटे दत्ता
सरले उपाय
अर्थ जाणण्याचे
प्रतिक मनाचे
ढेपाळले
नकाराचा गळा
शब्द झाले गोळा
मिटून घे डोळा
शोधणारा
व्यर्थ गेलो आम्ही
अर्धवट मरू
कोणावर धरू
राग मग
असावी फाटकी
आपुलीच झोळी
म्हणूनी मोकळी
गमे सदा
विक्रांत शोधतो
चुकलेली गाडी
जगाच्या धबाडी
अडकून
एक तुझी आस
केवळ मनास
अवघा आभास
दूर करी
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

परानुभूती



परानुभूती
*******

अधाशी मनाला 
उन्मनी वाटली 
नशा काही केली 
दुसऱ्याची 

परी काही केल्या 
जाईना तो तोल 
सरेना नि बोल
अडकला 

फुकटची नशा
चढत नसावी 
इथली असावी 
रित काही 

आणि खिसा खाली 
नाहीं छण छण
कलाल कुठून 
काय देई 

जावे खाल मानी
इथून निघून
तोंड लपवून
से होते 

झिंगल्याचा भा
हरवून जाता
तुज दारी दत्ता
पुन्हा आलो

चौदावीचे स्तन्य
देई मज दत्ता
तुर्येच्या अमृता
पान करी

उनाड विक्रांत
विकला प्रेमाला
तुझिया भेटीला
सारे करी

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

****

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...