शनिवार, ४ ऑक्टोबर, २०१४

जखमा भरतातच सगळ्या




जखमा भरतातच सगळ्या
असे ते म्हणतात 
पण हे काही खर नाही
सदुसष्ट वर्ष झाली
ती जखम अजून भरत नाही
हिंदुस्तानचा जन्म अजून होत नाही
ती जखम घेवून मेलेत किती
किती मरणार माहित नाही
ती सरहद्द त्या तारा ते कुंपण
ती दुष्मनी तो वैराचा अंगार
का कधीच संपणार नाही
कळत नाही

विक्रांत प्रभाकर

कोसळलं झाड






शेकडो वादळ झेलून शेवटी
कुठल्या तरी एका वादळासमोर  
नतमस्तक होतं झाड
आधार सुटून..
संपूर्ण उन्मळून ..
पडतं कोसळून...
तेव्हा वाटतं
अरे हे वादळ आलं नसतं
तर झाड पडलं जगले असतं
मधुर फुलांनी पुन्हा एकदा
लगडून गेलं असतं
त्यावेळी ..
रस्त्यावर अडकलेलं ट्रफिक
हळू हळू पुढे सरकत असतं
मनातल्या मनात चरफडत..  
स्वत:शीच पुटपुटत..
शिव्या घालत...
सालं या झाडालाही
आजच पडायच होतं का ?
अन ..
कोसळलेल्या त्या झाडाची पानं
असतात हलकेच लहरत 

विक्रांत प्रभाकर

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०१४

द्वेष भीक





रे तुझ्या प्रेमाने
जगविले आजवर
सुखात हरविले
भारावले आजवर 

तूच पण आता जर
असशील जाणार दूर
द्वेषाने हृदय माझे

घनघोर असे भर

चोळामोळा जीवन जर
असशीलच करणार
अखेरचे माझे हे
एवढेच काम कर 

इतके दु:ख दे मला
प्रहार कर मनावर
तडफडून काळीज माझे
होवू दे रे जहर 

तुझ्यासाठी हे फार
अवघड नाही बर
त्या तुझ्या द्वेषावर
जगेन मी यावर

 विक्रांत प्रभाकर


रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...