शनिवार, १ जून, २०१३

नको येवूस कधीही






नको येवूस तू कधी 

काही अडणार नाही

तुटुनिया गेली स्वप्ने 

शोके रडणार नाही



मी झेलीले आहे उरी

तप्त खदिरांगार ही

दु:खे कधीच कुठल्या  

आता जळणार नाही



फुंकले आयुष्य सारे

असा खचणार नाही

प्रीतीच्या नाटया तुझ्या   

पुन्हा बधणार नाही



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/


मनाचे मनपण मिटू दे




मनाचे मनपण मिटू दे

देहाचे या भोगणे सुटू दे

माझ्या अवघ्या अस्तित्वावर

फक्त तुझे प्रेम उरू दे



भोगामध्ये लोळत आहे

मनामध्ये जळत आहे

तुझ्या वाचून विश्वंभरा

रोज रोज मरत आहे



असले कसले हे जगणे

चिंध्या जोडून वस्त्र नेसणे

फसवूनिया आपल्या मना 

सोंग सुखाचे उगा दाविणे



विक्रांत प्रभाकर

शुक्रवार, ३१ मे, २०१३

गोरी बायको कश्यासाठी ?




https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjjLPft2uKrIkzfmtGnhM-eHR3hX6NEXK9ADJX-nl8v6AuEkDaqZCR87qj9xoQ5WxPsBQQTGAPyE79P4sym2KcQgmwHR3ALFkNsxgKNple7a9nJFVPCXo-8cAYz7Za45kj143DZmqoF1Um2/s320/Girl.bmp




गोरी बायको कश्यासाठी ?

लोकांनी पाह्ण्यासाठी

आपल्यावर जळण्यासाठी

त्यांना जळतांना  पाहून

आपण खुश होण्यासाठी .

गोरी बायको कश्यासाठी ?

समारंभी मिरवण्यासाठी

गर्दीत सांभाळण्यासाठी

सांभाळतांना तिला तसे

गर्दीत हिरो ठरण्यासाठी

गोरी बायको कश्यासाठी ?

गोरी पोर होण्यासाठी

कष्ट त्यांच्या लग्नाचे

आपोआप टाळण्यासाठी

गोरी बायको कश्यासाठी ?

कुणा विसरून जाण्यासाठी

तुझ्याहून सुंदर गोरी ...

असे काही जिरवण्यासाठी



विक्रांत प्रभाकर

 

त्याने होय म्हणताच




त्याने होय म्हणताच 
सर्वांगी हर्ष दाटला
थांब क्षणभर मना
जरा सावरू दे मला

स्वप्नातील स्वप्न असे
दिसे आज जागृतीला
जणू एक मोरपीस
स्पर्शले रे  हृदयाला 

आज साऱ्या तपस्येचे
पुण्य आले रे फळाला
याहून अधिक काही..
नाही नि नकोच मला 

त्याचा हरेक शब्द मी
हृदयामध्ये झेलला
देहातील कण कण
आज वादळ जाहला

हे खगांनो हे फुलांनो
सांगा हे साऱ्या जगाला
प्रकाश अन वाऱ्यानो
पसरा दाही दिशाला

विश्व पुरेना आनंदा
काय करु हृदयाला 
त्याने स्वीकारले मला
अर्थ जीवनाला आला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




गुरुवार, ३० मे, २०१३

कवीराजा (नवरंग १९५८ -भरत व्यास स्वैर अनुवाद)

    
  
कवीराजा
करू नकोस उगाच शब्द तोडमोड
काही धंदा कर थोडे पैसे जोड
शेर शायरी तुझी नच कामी येणार
कवितेची वही अन वाळवी खाणार
भाव वाढतो वेगान धान्य महागते भराभर
मरशील उपासाने भुके जागशील रात्रभर
म्हणून सांगतो तुज मित्रा हे सारे सोड 
काही धंदा कर थोडे पैसे जोड
चल फेक पेन ते कर बंद काव्यमशीन
बघ रोकड किती घरी नि शिल्लक अजून
घरात उरले किती तूप नि गरम मसाला
किती पापड लोणच अन तिखट मसाला
किती तेल मिरची हळदी नि धने जिरे
कविराजा अन हळूच तू वाणी बन रे
अरे पैशावर लिही काव्य अन गीत भूकेवर
गव्हा वरती गझल होऊ दे शेर धान्यावर
लवंग मिर्ची वर चौपाई तांदुळावर दोहे
कोळश्यावर लिहशील तर वाह क्या बात है
कमी भाड्याच्या खोलीवर लिही कव्वाली
छन छन करती रुबाइ ती पैसेवाली
शब्दांच्या जंगलात खूपच गोंधळ असतो
कवी संमेलन मित्रा भांडण तंटा असतो
मुशायरयाचे शेर सारेच रगडा असतो
पैसेवाला शेर फक्त वाहवा मिळवतो
म्हणून सांगे मित्रा करू नको डोकेफोड
काही धंदा कर थोडे पैसे जोड

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २९ मे, २०१३

करतात घाण



करतात घाण रस्त्यात लोक
थुंकतात घाण जिन्यात लोक
लावूनिया पाट्या जागोजागी
पाटीवरी त्या थुंकतात लोक
कधी गांधीगिरी ती करू जाता
फेकूनि घाण बोलावतात लोक
कुणाची घाण काढू किती मी
मलाच घाण म्हणतात लोक
प्रश्न कळकळीने जरी मांडला
टाळूनि मज हसतात लोक
येता कधी मग शब्दात घाण
पाहुनी ती का चिडतात लोक ?
अशी घाण टाकुनी जागोजागी
मनी घाण का लपवतात लोक ?

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


नक्षलवादी..




आमचीच मारतात
का आम्हास हि माणसे
आपलेच रक्त कशी
सांडतात हि माणसे .
जळूनिया कूस आई
हंबरडा फोडते  रे
आज त्याची उद्या तुझी
घर हेच जळते रे  .

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

महफ़िल

महफ़िल  ******* यारों के दिलदारों के टीकट आ रहे हैं ।   महफ़िलों के रंग सूने हो रहे हैं । तुम किस सुबह का इंतजार कर रहे हो?  ...