जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
सोमवार, २९ एप्रिल, २०१३
गुरुवार, २५ एप्रिल, २०१३
डॉक्टरी नोकरी
शेकडो रुग्ण
तपासतांना
रोगांच्या
साथीत
वेढलेले
असतांना
नातेवाईकांच्या
झुंडी
अंगावर
झेलतांना
गुंड पुंडांना
तोंड देतांना
एकच असते भिस्त
एकच असतो आधार
एक तारखेपर्यंत
बेंकेत पडेल
पगार .
तसे काम छान
आहे
मित्र मंडळीत मान
आहे
घातल्यावर अॅप्रन
वाटे
देवाचेच वरदान
आहे .
पण जेव्हा पडते
कानावर
न केलेल्या
चुकीमुळे
मृत्यूच्या
खेळामुळे
सस्पेन्शन आले
मित्रावर
काळे फासले
गेले तोंडावर
अॅप्रनमधील हवा
निघून जाते
तोफेच्या तोंडी
आहोत
असेच अन वाटू
लागते
घरी जाणारा
प्रत्येक पेशंट
घरी गेल्यावर
..
मरेन असे वाटू
लागते
आपल्या ड्युटीत
जर
काही असेच झाले
तर
या वयात काय
करायचे
चाळीस पन्नाशीत
तोड कुठे वेंगाडायचे
घराचे कर्ज कसे
फेडायचे
मुलांचे शिक्षण
कसे करायचे
हळू हळू येणारा
प्रत्येक
पेशंट शत्रू
वाटू लागतो
भरलेल्या
कॅजुल्टीचा
वीट येवू लागतो
वाटते हॉस्पीटल
सोडून
दूरवर पळून जावे
याला त्याला
पैसे देवून
वा कुणा वशिला
लावून
दवाखान्यात
बसावे
सर्दी
खोकल्याचे “चांगले”
पेशंट रोज
पाहावे
पण ओळख लागत
नाही
देणे घेणे जमत
नाही
म्हणून त्याच
चक्रात
राहतो गरगर
फिरत
लोक जरी म्हणती
चांगला डॉक्टर
आहे
आमचा जीव वाचवतो
त्यांना काय
माहित
रोज तो मरत
असतो
विक्रांत
प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
शनिवार, २० एप्रिल, २०१३
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
भय
भय *** किर्र निर्मनुष्य अश्या जयंती माता जंगलात मऊ मातीत उमटलेली ताजी व्याघ्र पावुले अन् एकटेपणी चाललेली माझी परिक्रमा . वि...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
दत्ता येई रे ******** दत्ता येई रे भक्ती देई रे मज नेई रे तुझ्या गावा ॥१ धन नको रे मान नको रे शान नको रे जगतात ॥२ तुला पहावे ह...
-
नर्मदेच्या तीरावर ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत कधी भेटतो तीर सु...
-
भय *** किर्र निर्मनुष्य अश्या जयंती माता जंगलात मऊ मातीत उमटलेली ताजी व्याघ्र पावुले अन् एकटेपणी चाललेली माझी परिक्रमा . वि...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
खेळ .**** दुःख दबकत्या चाली येते निजलेल्या घरी व्यथा अंधार काजळी जाग साकळते डोळी ॥१ होती सांज सजलेली धुंद गंधाने व्यापली मं...
-
देव देश अन धर्मासाठी ********** जन्म देवासाठी जावो हा सगळा भावभक्ती मळा फुलो सदा ॥ देह देशासाठी जावो हा सगळा ...
-
कृपा **** कृपा तुझी कोवळीसी हलकेच बरसली चांदण्याची वेल जणू आकाशात पसरली कृपा तुझी गवसली हृदयात विसावली डोळीच्या कडेवर रेख झा...
-
वृक्ष तोडी निमित्त ************** महाजन येन गतः स पंथाः नको जावूस तू रे कधी वृथा असे म्हणण्याची वेळ आलीय देवा, आत्म पर...


