मिच्छामी दुक्कडम (जरा अवेळी )
******
वळवले दाम ठोठावले काम मिटे आश्वासन कुठे वर्धमान ॥
तुझाच भरोसा आता तीर्थंकरा
उणीव न यावी तुझिया नावाला ॥
दुक्कडम दुक्कडं कितीही करा
हिशोबी तसाच का कागज कोरा ॥
पुण्याईचा जन्म होतो रे मनात
नेतो रसतळा अन तळतळाट ॥
शुभेच्छा वाचून उत्कर्ष तो नाही
झाकले कान त्या कळणार नाही ॥
मिच्छामी खरेच प्रगट ती व्हावी
देण्याऱ्याची झोळी भरूनिया जावी ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ 🕉️ .
विश्लेषण पण आवश्य करा सर भाव बहरेल
उत्तर द्याहटवा