स्वप्न
****
आता आठवांना गंध येत नाही पुष्प मिटलेली दुःख देत नाही
चाळवते जाग सत्य कळू येते
बदलते कुस स्वप्न विझू जाते
पण जीवनाचे गूढ असे कोडे
कळूनही कधी रडू कोसळते
हरवणे खोटे रडणे ही खोटे
मनी रचलेले राज्य असे खोटे
बजावून पुन्हा निद्रा वेढू घेते
नव्या स्वप्नी परी मन धूंद होते
द्यावी म्हणते मी नदीत सोडून
स्वप्न बेवारस डोळे चूकवून
कवच कुंडले तयाची दिसती
जाणे ठाकणार समोर ती कधी
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा