बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४

भक्त करी


भुक्ती मुक्तिदाता
*******
भुक्ती मुक्तिदाता प्रभू गुरु दत्ता
घेई मज पदा आता तरी ॥

काय माझी शक्ती तुज मिळवावे 
कोटी जन्म द्यावे तरी कमी ॥

नाही केले ध्यान नाही नाम गाणं 
आचरले आन मूढ मार्ग ॥

काय तुज मागू लाज वाटते रे 
रिकामे हे सारे माझे पात्र ॥

परी तू परीस कामधेनु माया 
कल्पतरू छाया होशी मला ॥

हृदयी धरी रे पदासी ठेवी रे
कृपाळा करी रे भक्त तुझा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उसना

उसना ****** मी कुठे मागतो मोक्ष या जन्मात  प्रवेश  शून्यात क्षण मात्रे ॥ देई रे पावुले ठेवण्यास माथा  दत्त अवधूता कृपावंता ॥  सर...