गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४

दत्त आकाश

दत्त आकाश
**********
पंख लेऊनी वादळी 
असा उधाणत गेलो 
जन्मोजन्मीचे किटाळ 
क्षणी झटकून आलो ॥१
नाही भय शंका काही 
दत्ता शरण मी गेलो 
जीणे आभास काळाचा 
सुख दुःखात हसलो ॥२
भोग उरला सुरला 
नात्यागोत्याचा व्यापार 
तोही सुटेल क्षणात 
पाने उलटून चार ॥३
मज अलिंगतो दत्त 
मज उधळतो दत्त 
बळ देऊन पंखात 
नेई उंच आकाशात ॥४
दत्त कृपेचा प्रकाश 
लक्ष तरंग नभात 
कण इवला विक्रांत 
गेला विरून तयात ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तेजोनिधी

तेजोनिधी ******** कशाला रे देसी फुका मानपान  रूते तनमन संसारात ॥ सुखाची भोंगळ दुःखमयी काया  मिरवतो माया डोईवर ॥ पुरे झाले देवा ग...