वादळ
******
कुठल्या जगात का उठे वादळ अवघाच खेळ अज्ञाताचा ॥
कोण कुणा भेटे कुठल्या ओढीने
पापण्यात गाणे साचलेले ॥
ओठी येती शब्द अर्थ नसलेले
पाण्यात पडले जैसे पान ॥
जरी म्हणावे या व्यर्थ अपघात
परि वाटतात ठरवले ॥
कुठल्या जन्माचे प्रारब्ध साचले
देणे वा उरले कुणासाठी ॥
विक्रांत थक्कित पाहतो जगणे
होऊन जगणे वाहे मुक्त ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा